पोटाची खळगी भरण्यासाठी रेल्वे गाड्यांमध्ये खेळणी विकणाऱ्या अथवा गायन, संगीत कला सादर करणाऱ्या वांगणी येथील सुमारे ४५० अंध बांधवांसोबत कार्य सम्राट सांसद डॉ शिंदे ने साजरी केली दिवाळी

महाराष्ट्र : (कल्यान लोकसभा) 


पोटाची खळगी भरण्यासाठी रेल्वे गाड्यांमध्ये खेळणी विकणाऱ्या अथवा गायन, संगीत कला सादर करणाऱ्या वांगणी येथील सुमारे ४५० अंध बांधवांसोबत कार्य सम्राट सांसद डॉ शिंदे ने साजरी केली दिवाळी
ठाणे जिल्ह्यातील वांगणी येथील साधारण ४५० च्या आसपास अंध बांधवांची घरं आहेत. डोळ्यांसमोर अंधार असतानादेखील स्वावलंबनाचे आदर्श ठेवत प्रामाणिकपणे जगाकडे बघण्याच्या दृष्टिकोनातून मुंबईतील लोकल ट्रेनमध्ये खेळणी, पेनं, टिकल्या विकून तसेच सुमधूर गाणी गाऊन आपल्या कुटुंबियांचा उदरनिर्वाह करणाऱ्या या मंडळींसोबत आज दिवाळी साजरी करत त्यांना दिवाळीनिमित्त #शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री मा.ना.श्री.उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या सूचनेनुसार तसेच पालकमंत्री मा.ना.श्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ.श्रीकांत शिंदे फाऊंडेशन वतीने किराणा सामान, दिवाळीचे साहित्य, मिठाई व फराळाचे वाटप केले.


कोरोना साथीच्या संकटकाळात पुकारण्यात आलेल्या लॉकडाऊन मध्ये लोकल ट्रेन बंद असल्याने उपासमारीची वेळ आलेल्या वांगणी येथील अंध बांधवांना डॉ.श्रीकांत शिंदे फाऊंडेशनच्या वतीने जीवनावश्यक वस्तू, किराणा सामान पुरविण्यात आले तसेच शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या माध्यमातून त्यांच्यासाठी आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करीत #सॅनिटायझर, #मास्क, #डेटॉल, जीवनसत्त्वांच्या गोळ्या व औषधांचे मोफत वाटप करण्यात आले होते. त्यावेळी गर्भवती असलेल्या अंध महिला भगिनींना अर्थिक मदत करत त्यांच्या प्रसूतीचा सर्व खर्च देखील उचलण्यात आला


अनलॉकची प्रक्रिया सुरु होत असताना सर्व प्रकारच्या सुरक्षेचे उपाय अवलंबत आपण सर्वजण आपल्या कुटुंबियांसोबत दिवाळी साजरी करीत असताना वांगणीस्थित या अंध बांधवांना कोरोना महामारीमुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे या अंध बांधवांच्या कुटुंबियांना दोन वेळच्या जेवणाची भ्रांत आहे याची जाण ठेऊन आज वांगणी येथे उपस्थित राहून अंध बांधवांशी संवाद साधला, कोरोना लॉकडाऊनमध्ये प्रसूत झालेल्या महिला भगिंनीची आरोग्य व वैद्यकीय चौकशी करीत त्यांच्या बाळाची आपुलकीने तपासणी करत भेट वस्तू दिल्या. जीवनातील अंध:कार तसेच अचानक उद्भवलेल्या अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतसुद्धा जीवनाकडे सकारात्मकतेने बघण्याच्या त्यांच्या दृष्टिकोन खूप ऊर्जा देऊन गेला.


याप्रसंगी अंबरनाथ उप-जिल्हाप्रमुख एकनाथ शेलार, तालुका प्रमुख बाळाराम कांबरी, बदलापूर शिवसेना शहरप्रमुख वामन म्हात्रे, वांगणीचे सरपंच केतकी शेलार, शिवसेना वैद्यकीय मदत कक्षप्रमुख मंगेश चिवटे, वांगणीचे शिवसेना शहरप्रमुख प्रसाद परब आणि स्थानिक शिवसेना पदाधिकारी आणि शिवसैनिक उपस्थित होते ।